होलार समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था
होलार समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र
रजि.नं:महा एफ् - ५९१२५/ पुणे
विठ्ठलवाडी आकुर्डी पुणे येथे १९८२ साली होलार समाजाची रजि. संघटना स्थापन केली ती पिंपरी चिंचवड शहरापुरती मर्यादित होती त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही छोटे-मोठे अनेक कार्यक्रम घेतले शिक्षणासाठी मदत केली शाळा हायस्कूल प्रवेशासाठी सहकार्य केले पुरुष बचतगट चालवून अनेकांना आर्थिक सहकार्य केले
वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण शिबीर घेतले.
कालांतराने महाराष्ट्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी महाराष्ट्रातील अनेक संघटनांचे एकत्रीकरण करून एकच संघटना स्थापन करण्याचा विचार केला त्याप्रमाणे पुण्यामध्ये एक बैठक झाली त्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे पिंपरी चिंचवडची अखिल होलार समाज मागासवर्गीय संघ ही रजिस्टर संघटना बरखास्त केली व होलार समाज महासंघ महाराष्ट्र ही संघटना स्थापन करण्यात आली परंतु त्या संघटनेचे कार्यही जास्त काळ चालू शकले नाही तेव्हापासून पिंपरी चिंचवडकर गप्पच होते ज्या ज्या वेळी लग्नकार्य निमित्ताने किंवा अंत्यसंस्काराच्या
निमित्ताने समाज बांधव व कार्यकर्ते एकत्र येत असत त्यावेळी १९८२ साली ज्याप्रमाणे आपले कार्य होते तसे कार्य करणारी संघटना पिंपरी चिंचवड येथे स्थापन झाली पाहिजे हा विचार पुढे आला त्यातूनच दत्तात्रय पारसे, राजाराम आयवळे, सुभाष जावीर सर, दिलीप गुळीग, सचिन केंगार, विलास हेगडे, श्रीनिवास जावीर,
सचिन आयवळे शिवाजी जावीर बाबासाहेब ढोबळे, राजेन्द्र गेजगे सर, अरविंद गुळीग यांनी विठ्ठलवाडी आकुर्डी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात पहिली मिटिंग घेतली व त्यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील होलार समाजाची जनगणना करण्याचा निर्णय घेतला व तशाप्रकारचा फाॅर्म तयार करुन घेतला पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी,निगडी
देहुरोड देहुगाव असे भाग तयार केले व सुट्टीच्या दिवशी व जसे जमेल तसे जनगणने बरोबरच समाजाचे प्रश्न सामाजिक अडचणी समजावून घेतल्या त्यातूनच होलार समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र ही संस्था स्थापन झाली व ह्याच नावाखाली कौटुंबिक जनगणना पुस्तिका छापण्यात आली त्या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा १७ डिसेंबर २०१९ ला संपन्न झाला.
२०२०साली धर्मादाय आयुक्तांकडे संस्था रितसर रजिस्ट्रेशन करण्यात आली
२) जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मार्च २०२० महिला मेळावा आयोजित केला व त्यामध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला
३) कोविड काळामध्ये आटपाडी तालुक्यात काही गावांमध्ये व पिंपरी चिंचवडमधील काही भागामध्ये गरजू समाज बांधवांना जिवनावश्यक साहित्याचे १२० किटचे वाटप करण्यात आले
४) २०२०कोविड काळामध्ये ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून कार्य अशा सर्व स्तरातील समाजबांधवांचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे संस्थेच्या छोट्या २०२०वर्षाची डायरीचे प्रकाशन करण्यात आले
५) २०२३ साली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व महिलांचा सन्मान करण्यात आला व त्याचबरोबर दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले.
६) २६/०५/२०२३ साली मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरात १३०महिला भगिनींनी लाभ घेतला.
७) गरजू होतकरू विद्यार्थ्यास एम.पी.एस.सी.परिक्षेसाठी दर महिना सतत ११ महिने २७००/- रुपये अर्थ सहाय्य केले.
८) २०२४ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा त्याचबरोबर आदर्श माता पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार, समाज रत्न पुरस्कार, व उद्योग रत्न पुरस्कार देऊन समाजातील समाज बंधू भगिनींना गौरवण्यात आले.
९) २०२४ इयत्ता १०वी,१२वी नंतर पुढे काय व १०वी, १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा सन्मानपत्र व शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले
१०) जानेवारी २०२५ दिनदर्शिका प्रकाशन व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला व मे २०२५ मध्ये संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच जून महिन्यात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ व शालेय साहित्य व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
११) डिसेंबर २०२५ दिनदर्शिका प्रकाशन व वधू -वर विवाह जुळणी पालक परिचय मेळावा व
घटस्फोटित- विधवा, विधुर स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
ही संस्था रजिस्टर्ड आहे या संस्थेचे पाच ऑडिट झालेले आहेत या संस्थेचा कारभार पारदर्शक आहे म्हणून या संस्थेला १२ए व ८० जी ही सर्टिफिकेट मिळाले आहे.
ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण, औद्योगिक,
अंधश्रद्धा निर्मूलन, समाज परिवर्तन, आरोग्य अशा समाजोपयोगी उपक्रम राबविणे हे संस्थेचे ध्येय व उद्दिष्टे आहेत.
या साठी सर्व समाज बांधवांनी व हितचिंतकांनी सहकार्य करावे.
ही नम्र विनंती.
आपला स्नेही
दत्तात्रय पारसे - अध्यक्ष